क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai ATS News : पाच बांगलादेशी नागरिकांना अटक, एटीएसने मुंबईत मोठी कारवाई

Mumbai Police ATS Arrested Bangladeshi Migrant : एटीएसला मोठे यश मिळाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या पथकाने मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 5 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या नागरिकांकडे कोणतीही वैध कागदपत्रे सापडलेली नाहीत.

मुंबई :- महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. Mumbai Police ATS Arrested Bangladeshi Migrant या बांगलादेशींना मुंबईतून अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एटीएसच्या युनिटने (मुंबई) काळाचौकी या ठिकाणी कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “एटीएसने एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली आणि पाच बांगलादेशींना अटक केली. गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेली माहितीच्या आधारे एक बांगलादेशी महिला चिंचपोकळी ईस्ट येथे कामाला आहे. पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले सखोल चौकशी केली असता तिने तिचे नाव आशुरा खातून असल्याचे सांगून ती सातखीरा, बांग्लादेश येथे राहणारी असल्याचे पोलिसांच्या तपासात माहिती समोर आली.अटक करण्यात आलेले सर्व बांगलादेशी वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत होती.

महिलेकडे तपास केला असता, तिच्यासह अन्य 04 बांग्लादेशी नागरीक देखील कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय तसेच भारत बांग्लादेश सीमेवरिल मुलकी अधिका-याच्या लेखी परवानगी शिवाय, घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला असल्याचे समजले. पोलिसांनी या प्रकरणी चार बांगलादेशी नागरिकांनाही अटक केली आहे. मोहम्मद सलाम सरदार उर्फ बांग्लादेशी नाव अबु सलाम (रा‌. अलीपूर, डाकघर, अलीपूर),सोहाग सफिकुल सरदार ऊर्फ मोहम्मद सोहाग सफिकुल इस्लाम, (वय 28 रा.जिल्हा सातखीरा, विभाग खुलना, बांग्लादेश),मोहम्मद शमिम मुराद हसन अली ऊर्फ समिम मुल्ला (वय 27 रा. ग्राम शाखारिगटी, रुपदीया, जिल्हा जोशोर, विभाग खुलना, बांग्लादेश),मोहम्मद आलामिन लतिफ मोरोल, (वय 29 रा. ग्राम अजिजपुर, युनियन देभाटा, उपजिला देभाटा, जिल्हा सातखीरा, बांग्लादेश) असे 04 बांग्लादेशी नागरीकांना ताब्यात घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0