पुणे

Pune Crime News : सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाकडूनच घरफोडी; पर्वती पोलिसांची धडक कारवाई

पुणे : पर्वती पोलीसांनी एका धक्कादायक गुन्ह्याचा छडा लावत सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाकडूनच झालेली घरफोडी उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ₹८,६५,०००/- किंमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज हस्तगत केला आहे.

दि. ८ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान औदुंबर सोसायटी, गणेशमळा, सिंहगड रोड, पुणे येथील एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे ऐवज असा मुद्देमाल चोरीला गेला होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तयार करून परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. तपासादरम्यान संशयित सोसायटीचा सुरक्षा रक्षक राकेशकुमार मुलचंद सोनी (वय २९, मूळ गाव- अनुपपूर, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यानेच घरफोडी केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला ₹८.६५ लाखांचा ऐवज जप्त केला.

या गुन्ह्याचा यशस्वी तपास अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परि-३) संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. ही कारवाई उपनिरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमोल दबडे, महेश मंडलिक, अमित चिव्हे, सूर्या जाधव, श्रीकांत शिंदे, सद्दाम शेख, मनोज बनसोड, नानासो खाडे, राकेश सुर्वे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0