महाराष्ट्र

Mangesh Chivate Attack News : “शिंदेंच्या ओएसडीच्या भावावर करमाळ्यात प्राणघातक हल्ला; जिल्ह्यात खळबळ!”

करमाळा : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी व ओएसडी मंगेश चिवटे यांच्या भावावर आज सकाळी करमाळ्यातील हिवरवाडी येथे प्राणघातक हल्ला झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव महेश चिवटे असून ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेलेल्या महेश चिवटेंवर अज्ञात हल्लेखोरांनी जीव घेण्याच्या उद्देशाने अचानक हल्ला चढवला.

पोलीसांची धावपळ!
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजीत माने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळ सील करून चौकशी सुरू केली आहे. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

हा हल्ला केवळ करमाळ्यातच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
शिंदेंच्या सर्वात जवळच्या माणसाच्या भावावर हल्ला म्हणजे राजकीय सूड की स्थानिक वाद?
हल्ल्याला राजकीय रंग चढतोय का?
याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

हल्लेखोर शोधात
पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. तपासाची सूत्रे पोलीस स्वतःकडे घेत असून, “या हल्ल्यामागचे सूत्रधार कोण?” हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटे यांचा भाऊ महेश चिवटे यांच्यावर हल्ला
शिवसेनेचा जिल्हाप्रमुख; प्राणघातक वारांनी घेरलं
पोलीस घटनास्थळी, तपास सुरू
हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0