पुणे
Trending

Pune Breaking News : हिंजवडीत रस्ता रुंदीकरणाच्या कामाला विरोध, प्रक्षोभक भाषण… पोलिस यंत्रणेला आव्हान देणारा ताब्यात

हिंजवडीचा ‘मार्ग‘ मोकळा करताना पोलिसांवरच आगपाखड

दादा, प्रशासनाचे निर्देश धुडकावून प्रक्षोभक विरोध

Pune News : आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंजवडीच्या ट्रफीक समस्येची बदनामी होत असल्या कारणाने त्याचे समाधान शोधण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला व पोलिस यंत्रणेला रोड विस्तारीकरण करण्यासाठी आदेश दिले होते. हिंजवडीचा ‘मार्ग‘ मोकळा करण्यासाठी हिंजवडीचे गतवैभव पुन्हा मिळवुन देण्यासाठी मनपा, पीएमआरडीए व पोलिस दल तत्परतेने कारवाई करत आहे. अशातच काही असंतुष्ट घटकाकडून रस्ता रुंदीकरणाला विरोध करत प्रक्षोभक भाषण देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस यंत्रणेने त्वरित कारवाई करत प्रक्षोभक भाषणे देणाऱ्याला ताब्यात घेतल्याने हिंसाचाराला वेळीच पायबंद बसला आहे.

IT पार्क हिंजवडी, मान येथील रस्ते रुंदीकरणाच्या कामादरम्यान नागरिकांना भडकाविणाऱ्याला एकाला हिंजवडी पोलिसांनी घेतलं ताब्यात आहे. दरम्यान, हिंजवडीमधील वाहतूक कोंडीमुळे काही कंपन्यांनी स्थलांतर केलं आहे. त्यानंतर अजित पवार यांनी स्वतः या वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांकडे लक्ष घातले आहे. रस्ते रुंदीकरणाच्या कामादरम्यान कोणी जर अडथळा निर्माण करत असेल तर याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करा असे थेट आदेशच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आज रस्ते रुंदीकरणाच्या कामादरम्यान काही नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. काही नागरिकांनी पोलिस अधिकाऱ्यास यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागरिक आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. दरम्यान, हिंजवडी ,मान परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी पोलिस बळाचा वापर केल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार कोणतीही नोटीस न देता बांधकामे पाडण्यासाठी पोलिस आणि PMRDA प्रशासन आले आणि त्यानंतर वाद निर्माण झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0