Mira Bhayandar Police : मिरा-भाईंदर परिसरात पोलिसांची मोठी गुटखा कारवाई; ₹१५.६९ लाखांचा अवैध साठा जप्त

मिरा-भाईंदर : परिमंडळ १ अंतर्गत पोलिसांनी मिरा-भाईंदर परिसरात विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत तब्बल ₹१५,६९,२३९ किंमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त श्री. राहुल चव्हाण (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली २१ व २२ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली. Mira Bhayandar Police Latest News
अवैध गुटख्याच्या साठवणुकी व वाहतुकीबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली. या मोहिमेत चार वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून प्रत्येकी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. Mira Bhayandar Police Busted Gutkha Seller
२१ ऑगस्ट २०२५, राईगाव उत्तन, भाईंदर : ₹५,०१,२४५ किमतीचा गुटखा जप्त; गु.र.क्र. २७७/२०२५, भाईंदर पोलीस ठाणे.
२१ ऑगस्ट २०२५, जनता नगर झोपडपट्टी, निलकमल नाका : ₹७६,८५६ किमतीचा गुटखा जप्त; गु.र.क्र. ३८६/२०२५, काशिगाव पोलीस ठाणे.
२२ ऑगस्ट २०२५, मुंशी कम्पाऊंडकडे जाणारा रस्ता, कृष्णस्थळ अपार्टमेंट : इको कारसह ₹७,१५,४०० किमतीचा गुटखा जप्त; गु.र.क्र. ३७१/२०२५, काशिगाव पोलीस ठाणे.
२२ ऑगस्ट २०२५, मुंशी कम्पाऊंड, मिरा रोड पूर्व : ₹३,५२,५९४ किमतीचा गुटखा जप्त; गु.र.क्र. ३७२/२०२५, काशिमीरा पोलीस ठाणे.
सर्व प्रकरणांत अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच भारतीय दंड संहिता कलम २२३, २७४, २७५, १२३ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा, काशिगाव व भाईंदर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी केली.


