Vijay Wadettiwar : 4 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त! पूरस्थितीवरून काँग्रेस आक्रमक; ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून तातडीने विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी

•काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांचे राज्यपालांना पत्र; शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी आणि पुनर्वसन पॅकेजची मागणी
मुंबई :- मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढवला आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी या संकटावर तातडीने चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत राज्यपाल महोदयांना पत्र लिहिले आहे.
राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे कधीही भरून न येणारे मोठे नुकसान झाले आहे. पत्राद्वारे वडेट्टीवार यांनी नुकसानीचा तपशील मांडताना सांगितले की, राज्यात तब्बल 4 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. पूर आणि अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतजमिनी खरवडून वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे श्रम मातीमोल झाले आहेत.


जनजीवन विस्कळीत
या महापुरामुळे जनावरे वाहून गेली, घरे कोसळली आणि दुर्दैवाने काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारे महत्त्वाचे रस्ते खचल्याने दळणवळण व्यवस्था पूर्णपणे खंडित झाली आहे. तसेच, अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. पूर ओसरल्यानंतर आता अनेक भागांत पिण्याचे पाणी दूषित झाल्याने सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
कर्जमाफीसह ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी
राज्याला या गंभीर संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, यावर काँग्रेसने भर दिला आहे. वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे की, सरकारने तातडीने राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. बाधित शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी सरसकट आर्थिक मदत आणि पुनर्वसन पॅकेज त्वरित जाहीर करावे.
यासोबतच, राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी. पिके आणि मालमत्तेचे योग्य मूल्यमापन करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, असे काँग्रेसने म्हटले आहे. तातडीच्या या प्रश्नावर सविस्तर चर्चा होऊन ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन त्वरित बोलावण्याचा आग्रह वडेट्टीवार यांनी राज्यपालांकडे केला आहे.
विजय वडेट्टीवार यांचे राज्यपालांना दिलेल्या पत्र जशास तसे
प्रति,
मा. महामहीम राज्यपाल,
महाराष्ट्र राज्य,
राजभवन, मुंबई.
विषय- राज्यात झालेल्या अतीवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत
मा. महोदय,
मी आपले लक्ष महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह अनेक भागांमध्ये झालेल्या विक्राळ अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या अत्यंत गंभीर परिस्थितीकडे वेधू इचिऊतो या अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक पूर्णपणे संकटात सापडले असून त्यांचे कधीही अस्न न येणारे नुकसान झाले आहे नुकसानीची आणि आपत्कालीन परिस्थितीची काही प्रमुख कारणे व सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहेत.
पीक आणि शेतीचे प्रचंड नुकसान-
राज्यात तब्बल ४ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या खरवडून गेल्या आहेत, ज्यामुळे संतकन्यांचे आयुष्यभराचे श्रम मातीमोल झाले आहेत या हंगामात ५ टक्के देखील उत्पादन हाती येण्याची शक्यता नाही मालमत्ता आणि जीवितहानी-
पूरपरिस्थितीत अनेक जनावरे वाहून गेली, घरे कोसळली आणि दुर्दैवाने जीवितहानी देखील इराली आहे.
पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान-
बीजपुरवठा खंडित विजेचे खांब व तारा कोसळाल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे
दळणवळण ठप्प
गाव आणि शहरांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते छचल्याने वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था पूर्णपणे
खंडित झाली आहे
आरोग्य समस्या-
पिण्याचे पाणी दूषित झाल्याने सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण इसला आहे.या गंभीर संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी तातडीने ठोस धोरणात्मक निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी खालील प्रमुख मागण्यांवर तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे.
ओला दुष्काळ जाहीर करावा
राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी सरसकट, भरीव आर्थिक मदत आणि पुनर्वसन पॅकेज जाहीर करावे
कर्जमाफी आणि नुकसानभरपाई-
नुकसान झालेल्या सर्व संतकन्यांचे कर्ज माफ करण्याच्या, कर्जमाफी आपल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची हीच योग्य वेळ आहे तसेच, पिकांचे आणि मालमत्तेचे योग्य मूल्यमापन करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे या तातडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी, तसेच जनतेला दिलासा देणारे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन त्वरित बोलावण्याचा आपण सरकारला आग्रह करावा ही नम विनंती
करतो आपण या जनहिताच्या मागणीवर तात्काळ आणि सकारात्मक कार्यवाही कराल, असा विश्वास व्यक्त


