क्राईम न्यूजमुंबई
Trending

Chembur Crime News : चेंबूरमध्ये जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा महा-ऑपरेशन! जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मद्य मिळून सव्वा तीन कोटींचा मुद्देमाल जप्त

Chembur Crime Branch Busted Jugar Adda : बंद कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये जुगाराचा डाव; अड्डा चालक, कॅशिअर आणि खेळाडूसह एकूण 33 आरोपींना रंगेहाथ अटक

मुंबई :- चेंबूर पूर्व येथील एका व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजनबद्ध छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. 3 ऑक्टोंबर रोजी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाला (रूम नं.303/304 तिसरा माळा,) वसंतविहार कमर्शियल कॉम्प्लेक्स या ठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून छापा टाकला. Chembur Latest Crime News

या कारवाईत पोलिसांनी एक जुगार अड्डा चालक, एक कॅशिअर, जुगार खेळवणारे सात इसम आणि 24 खेळाळू असे एकूण 33 आरोपींना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी या अड्ड्यावरून रोख रक्कम दीड लाख रुपये, 3 कोटी 30 लाख 1 हजार 400 रुपयांचे जुगाराचे साहित्य, आर्थिक व्यवहारासाठी वापरले जाणारे पीओएस मशीन, आणि 10,000 रुपयांचे विदेशी मद्य असा एकूण 3 कोटी 31 लाख 66 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. Chembur Police Latest Crime aq

या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हा पुढील तपासासाठी कक्ष-8 कडे वर्ग करण्यात आला असून सपोनि संग्राम पाटील हे पुढील तपास करत आहेत. पोलीस आयुक्त देवेन भारती आणि पोलीस सह आयुक्त लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी यशस्वी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0