Kalyan Bribe News : आर.टी.आय कार्यकर्त्याचा खंडणीचा डाव उधळला; कल्याणमध्ये पोलीसांच्या सापळ्यात अटक

Kalyan Latest Crime News : हॉटेल व्यवसायिकांना खोट्या तक्रारीच्या धमकीने फसवणूक
ठाणे, कल्याण | हॉटेल व्यवसायिकांकडून खोट्या तक्रारींच्या धमकीवर खंडणी उकळणाऱ्या एका स्वघोषित आरटीआय कार्यकर्त्याला खंडणीविरोधी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. आरोपी नितीन शांताराम घोले (वय 49) यास कल्याण पश्चिममधील संतोष हॉटेलजवळ 50,000 रुपये स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा एक साथीदार सध्या फरार आहे. Kalyan Latest Crime News
तक्रारदार हॉटेल व्यवसायिकाने ठाणे गुन्हे शाखेकडे Thane Crime Branch तक्रार दिल्यानंतर तपास पथकाने 21 जुलै रोजी कल्याणमध्ये सापळा रचला. आरोपी घोलेने व्यवसायिकाकडून 50,000 रुपये रोख स्वीकारल्याच्या क्षणी पोलिसांनी त्याला अटक केली. सदर आरोपी स्वतःला आरटीआय कार्यकर्ता असल्याचे भासवत, शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने खोट्या तक्रारी दाखल करण्याची भीती दाखवून पैसे उकळत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
घोले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 308 (2), 308 (3), 308 (4), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल असून 25 जुलै 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. आरोपीचा एक साथीदार फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी हॉटेल व्यवसायिकांना आवाहन केले आहे की, अशाप्रकारची खंडणी मागण्यात आल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा गोरे यांच्याशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा गोरे, पोलीस हवालदार कानडे, शिंदे, पोलीस नाईक हासे, पोलीस शिपाई ढाकणे यांचा सहभाग होता.



