मुंबई
Trending

Sanjay Raut : “मद्य घोटाळा, मेडिकल घोटाळा, आणि मंत्रिमंडळाचं चारित्र्यहीन दर्शन!” — संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Sanjay Raut On Maharashtra Sarkar : “श्रीकांत शिंदेंच्या फाउंडेशनचा आर्थिक कणा असलेला अमित साळुंखे अटकेत; सुमित फॅसिलिटीमार्फत हजारो कोटींचा गैरव्यवहार” – गंभीर आरोप

मुंबई | झारखंडमधील मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेला अमित साळुंखे हा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी संबंधित असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. Sanjay Raut On Maharashtra Sarkar त्यांनी एका पत्रकार परिषदेत शिंदे पिता-पुत्रांवर तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचार, गैरव्यवहार, आणि नैतिक अधःपतनाचे गंभीर आरोप करत महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांची पोलखोल केली.

साळुंखेची कंपनी ‘सुमित फॅसिलिटी’ हीच श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनची आर्थिक पाठराखण करते, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, झारखंड पोलिसांनी साळुंखेला अटक केली असून, त्याच्याकडून नियमबाह्य कॉन्ट्रॅक्ट, बनावट टेंडर आणि मद्य व्यापारातून आलेला पैसा फाउंडेशनमध्ये वळवण्यात आल्याचा प्राथमिक पुरावा आहे.

“सामाजिक सेवा की ब्लॅक मनीचा वाइट वास?”

संजय राऊत म्हणाले, “श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये सामाजिक सेवेच्या नावाखाली ब्लॅकमनी व्हाईट करण्याचा खेळ सुरू आहे. 800 कोटींचा अ‍ॅम्ब्युलन्स टेंडर, साडेआठशे कोटींचा घनकचरा प्रकल्प — हे सगळे कॉन्ट्रॅक्ट सुमित फॅसिलिटी या कंपनीला शिंदे पिता-पुत्रांनी नियमबाह्य पद्धतीने बहाल केले.”

या कॉन्ट्रॅक्टसाठी आवश्यक असलेल्या प्रशासनिक मंजुरी, निविदा प्रक्रिया, आणि कागदोपत्री प्रोटोकॉल पूर्णतः धाब्यावर बसवले गेले, असा दावा त्यांनी केला. “हीच कंपनी फाउंडेशनला निधी पुरवते आणि अशाप्रकारे काळा पैसा सामाजिक सेवेतून पांढरा केला जातो,” असा आरोप त्यांनी केला.

“चारित्र्यहीन सरकार, मंत्रीपदाचं भान नाही” — राऊतांचा घणाघात

फडणवीस सरकारवर थेट टीका करताना राऊत म्हणाले, “आज या सरकारमध्ये कॅरेक्टर नावालाही उरलेलं नाही. एक मंत्री डान्स बार चालवतो, एक मंत्री उघड्या अंगाने फोटो काढतो, तर दुसरा टॉवेलवर मारीमारी करतो.”त्यांनी सरकारवर ताशेरे ओढत पुढे म्हटले, “जेव्हा गृहमंत्री स्वतः डोळेझाक करत आहेत, तेव्हा राज्यातील कायदा-सुव्यवस्था कोलमडलीच असे म्हणावे लागेल. फडणवीस यांना जर या सगळ्याचे गांभीर्य नसेल, तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा गौरव विसरून जावं.”

या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून त्याला कालमर्यादा द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. “त्यांना एसआयटी स्थापन करण्याची फार हौस आहे, मग इथेच करा ना!” अशी खोचक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

“मंत्रीपदाची शपथ लुटीकरिता घेतली आहे का?”, असा सवाल करत त्यांनी फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. “तुमचं मंत्रिमंडळ 75 टक्के युजलेस आहे. तुम्हीच त्यांच्या भ्रष्ट वर्तनावर झाक घालताय. का? तुमच्याकडे काही ‘सिक्रेट्स’ आहेत का जे शिंदे किंवा अजित पवार यांच्याकडे आहेत?”, असा धक्कादायक सवालही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0