क्राईम न्यूज
Trending

Mumbai Police News : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! पालघरमध्ये एम.डी. (मेफेड्रोन) उत्पादन कारखाना उद्ध्वस्त

Mumbai Police Take Action Against Drugs Racket : 13 कोटींहून अधिक किंमतीचा एम.डी. व कच्चा माल हस्तगत; अंमली पदार्थ विक्री आणि उत्पादन टोळीतील 5 आरोपींना अटक

मुंबई :- बृहन्मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-6 Mumbai Police Unit 6 मधील पथकाने अंमली पदार्थाविरुद्ध मोठी आणि निर्णायक मोहीम राबवत पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील एका अवैध कारखान्यावर छापा टाकला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी या कारवाईत तब्बल 13 कोटी 44 लाख 53 हजार 700 रुपये किंमतीचा एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थ आणि तो बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल हस्तगत केला आहे. Mumbai Police Latest News

या कारवाईची सुरुवात 5 ऑक्टोबर 2025 रोजी झाली. त्यावेळी परिमंडळ-6 च्या पथकास एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या इसमास ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे 57.84 ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ मिळून आला. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात Tilak Nagar Police Station गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या पुढील तपासादरम्यान, तपास पथकाने अटक केलेल्या इसमासोबत अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आणखी चार आरोपींना मुंबई आणि मीरा रोड येथून ताब्यात घेऊन अटक केली. अटक आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर, रशीद कंपाऊंड, खैरपाडा, भावखळ, पेल्हार, नालासोपारा, ता. वसई, जिल्हा पालघर या ठिकाणी अंमली पदार्थाची निर्मिती होत असल्याचे निष्पन्न झाले. Mumbai Latest Drug News

पोलिसांनी तातडीने या फॅक्टरीवर छापा टाकला. तिथे उत्पादन करणाऱ्या टोळीपैकी एका मुख्य आरोपीस अटक करण्यात आली. त्याने साथीदारांच्या मदतीने चालवत असलेल्या या कारखान्यातून पोलिसांनी एकूण 6 किलो 675 ग्रॅम एम. डी. (मेफेड्रॉन), तसेच अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व प्लॅन्टचे साहित्य असा 13 कोटी 38 लाख 53 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. Mumbai Latest Crime News

या संपूर्ण गुन्ह्यात अंमली पदार्थाची विक्री करणारे चार आरोपी आणि उत्पादन करणारा टोळीमधील एक आरोपी असे एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का व सु), सत्यनारायण चौधरी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-6 च्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0