Thane Bribe News : मोरपिसे प्रकरणात वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपयांची लाच घेताना अटक

Thane Latest Bribe News : गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली होती लाच, ठाणे लाचलुचपत विभागाची कारवाई
ठाणे :- मोरपिसे विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून लाच मागणाऱ्या वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. Thane ACB Trap त्यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी वनपाल निलेश श्रावणे (वय 47) आणि वन रक्षक मच्छिंद्र सोनटक्के (वय 25) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. Thane Breaking News
तक्रारदार हे सण-उत्सवाच्या काळात मुंबईच्या बाजारातून मोरपिसे खरेदी करून ती किरकोळ दरात मुंबई आणि ठाण्यात विकतात. गणेशोत्सवासाठी त्यांनी मोरपिसे आणली होती आणि ती विक्रीसाठी भावाकडे व ओळखीच्या व्यक्तींकडे दिली होती.सोमवारी वन विभागाच्या पथकाने मोरपिसे विकणाऱ्या त्यांच्या भावाला आणि इतरांना ताब्यात घेतले. तसेच, त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि जप्त केलेली मोरपिसे परत देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली.
याबाबतची माहिती तक्रारदाराला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, वनपाल निलेश श्रावणे यांनी तडजोडीअंती 25 हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. या लाच प्रकरणात वन रक्षक मच्छिंद्र सोनटक्के यांचाही सहभाग असल्याचे समोर आले.
एसीबीच्या पथकाने सापळा रचून या दोघांनाही 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


