क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Crime News : भरधाव रिक्षाने पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला! पोलीस उपआयुक्त गंभीर जखमी अधिकाऱ्याला उडवण्याचा प्रयत्न

Thane Latest Crime News : दुचाकीस्वार आरोपीस 24 तासांत अटक; गुन्हा ठाणे शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यावर

ठाणे | वाहतुकीचं नियंत्रण करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर भरधाव रिक्षा घालून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना ठाण्यात घडली आहे. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट हे स्वतः रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियमन करत असताना, एका रिक्षाचालकाने त्यांच्यावर थेट रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला. Thane Latest Crime News

ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री 9.20 वाजता, एमजी हेक्टर शोरूमजवळ, ठाणे–घोडबंदर मार्गावर घडली. रिक्षाचालक हेमंत संतोष वर्मा (वय 27) याने लोकसेवकाच्या सूचनांकडे कानाडोळा करत, भरधाव रिक्षा थेट अधिकाऱ्याच्या अंगावर चढवली. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत.

पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक केली. या प्रकरणी भारतीय दंड विधान 2023 मधील विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे करीत असून, चितळसर पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरते.या घटनेने पोलीस दलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0