Mumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! 1 जून रोजी मेगाब्लॉकचा फटका – रेल्वेसेवा विस्कळीत

•पश्चिम रेल्वे – कांदिवली यार्डवर 36 तासांचा ब्लॉक,सेंट्रल आणि हार्बर रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान लोकलसेवा बंद – पर्यायी मार्गांचा विचार करा
मुंबई :- रविवार, 1 जून 2025 रोजी मुंबईतील लोकल प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर नियोजित देखभाल व दुरुस्ती कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शेकडो लोकल गाड्या रद्द होतील, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी व्यवस्था आणि नियोजनपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
मध्य रेल्वे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्यानगरी ब्लॉक
वेळ: सकाळी 10.55 ते दुपारी 3.55
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्यानगरी दरम्यान स्लो लोकल सेवा डाउन स्लो गाड्या फास्ट ट्रॅकवर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर,माटुंगा,सायन कुर्ला येथे थांबतील आणि विद्याविहार येथे पुन्हा स्लो ट्रॅकवर जातील.अप स्लो गाड्या घाटकोपर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान फास्ट लाईनवर चालवण्यात येतील.
हार्बर रेल्वे– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/बांद्रा मार्गावर सेवा प्रभावित
वेळ: सकाळी 11.10 ते दुपारी 4.40
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस /वडाळा रोड वरून वाशी, पनवेल, बेलापूर आणि बांद्रा, गोरेगावकडे जाणाऱ्या गाड्या रद्द पनवेल, वाशी, गोरेगाव वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे येणाऱ्या गाड्या देखील रद्द कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल सेवा उपलब्ध राहणार आहे.
पश्चिम रेल्वे – कांदिवली यार्डवर 36 तासांचा ब्लॉक
वेळ: 31 मे (शनिवार) दुपारी 1.00 ते 2 जून (सोमवार) पहाटे 1.00
कांदिवली यार्डमधील जुन्या संरचना हटवणे व यार्ड पुनर्रचना,162 लोकल गाड्या रद्द काही लांब पल्ल्याच्या गाड्या वसई रोड किंवा भाईंदर येथून सुरू फास्ट ट्रॅकवर काही मेल/एक्सप्रेस गाड्या चालवण्यात येणार आहे.
प्रवाशांसाठी सूचना
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना पुढील सूचना देण्यात आल्या आहेत:
प्रवासाच्या आधी m-Indicator किंवा अधिकृत रेल्वे अॅप्सवर वेळापत्रक तपासा
शक्य असल्यास या वेळेत टाळून प्रवास करा
बस सेवा किंवा रिक्षा/कॅब्सचा पर्याय वापरण्याचा विचार करा
स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आगाऊ नियोजन करा


