मुंबई

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना सुनावले

Rohit Pawar On India Aghadi : इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत…. भाजपाने विजयाश्री खेचून आणला..!! आमदार रोहित पवार

मुंबई :- दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये Delhi Vidhan Sabha भाजपाच्या बाजूने बहुमत स्पष्ट झाले असताना राज्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनीही काँग्रेस आणि आप एकत्र लढणे अपेक्षित होते अशी खंत व्यक्त केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी इंडिया आघाडीच्या India Aghadi नेत्यांना खडेबोल सुनावले आहे. इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले पाहिजे होते. असे रोहित पवारांनी म्हटलं आहेत. रोहित पवार यांनी एक्सवर ट्विट करताना अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली आहे असे म्हटले आहे.

आमदार रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! 15 हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा 20 जागांच्या वर देखील गेली नसती.

रोहित पवार पुढे म्हणाले की, दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0