ठाणेमुंबई
Trending

Mumbai BMC Election : मुंबई महापालिका मतदार यादीत 11 लाख ‘दुबार’ नावे!

Mumbai BMC Voting List Fraud : एकाच व्यक्तीचे नाव शंभर वेळा! वरळीतील एका प्रभागात सर्वाधिक, गोपनीयता पाळल्याबद्दल प्रशासनावर टीका!

मुंबई :- मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी Mumbai Election जाहीर झालेल्या मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झाडल्या असताना, आता खुद्द पालिका प्रशासनानेच याबाबत कबुली दिली आहे. मुंबईतील एकूण 227 प्रभागांमध्ये तब्बल 11 लाख 1 हजार 505 दुबार नावे असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, यातील काही नावे दुबार, तिबार नव्हे, तर शंभर वेळा असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. Mumbai BMC Election List Update

4 लाख नावे अनेक वेळा, अनेक प्रभागांमध्ये

पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,11 लाखांहून अधिक दुबार नावांपैकी सुमारे 4 लाख 33 हजार मतदारांची नावे अनेक वेळा आणि मुंबईतील विविध प्रभागांमधील मतदार यादीमध्ये आहेत. म्हणजेच, एकाच व्यक्तीचे नाव अनेक ठिकाणी असल्याने ही आकडेवारी फुगलेली दिसत आहे. सर्वाधिक दुबार नावे ही वरळी विधानसभा मतदारसंघातील एका प्रभागात आढळून आली आहेत.

कबूल करण्यास प्रशासनाची गोपनीयता

मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाने या संवेदनशील मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांना कोणतीच माहिती दिली नव्हती. राजकीय पक्ष आरोप करत असताना प्रशासनाने पाळलेल्या या गोपनीयतेबद्दल मुंबई महापालिकेच्या वार्ताहर संघाने आक्षेप नोंदवल्यानंतर अखेर मंगळवारी प्रशासनाला ही आकडेवारी सादर करावी लागली.

मतदार यादीची सद्यस्थिती

एकूण मतदार: 1 कोटी 3 लाख 44 हजार 315

पुरुष मतदार: 55 लाख 16 हजार 707

महिला मतदार: 48 लाख 26 हजार 509

तृतीयपंथी मतदार: 1099

दुबार नावे (चिन्हांकित): 11 लाख 1 हजार 504

हमपत्राने होणार मार्ग?

प्रशासनाने सांगितले आहे की, दुबार नाव असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार, याचे हमीपत्र घेण्यात येणार आहे. या दुबार नावांवर अंतिम निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार निवडणूक आयोगाचा असल्याचेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गुरुवारी, 20 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवण्यात येणार असून, 5 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0