देश-विदेश
Trending
77 वा प्रजासत्ताक दिन: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘राष्ट्रीय युद्ध स्मारका’वर वीर हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली l 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या Republic Day India सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीतील ‘नॅशनल वॉर मेमोरियल’ (राष्ट्रीय युद्ध स्मारक) येथे जाऊन देशाच्या वीर पुत्रांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधानांच्या आगमनावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते. युद्ध स्मारकावरील अमर चक्रासमोर काही वेळ मौन पाळून पंतप्रधानांनी शहीदांच्या शौर्याचे स्मरण केले. यानंतर त्यांनी स्मारकाच्या अभ्यागत पुस्तिकेत (व्हिजिटर बुक) आपला संदेश नोंदवला.
फोटो गॅलरी







