छत्रपती संभाजी नगर

Chhatrapati Sambhajinagar Bribe News : वाळू वाहतुकीवर कारवाई ना करण्याकरिता लाखाची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी एसीबीच्या सापळ्यात

•तक्रारदारास त्याच्या हायवा ट्रकने वाळू वाहतूक करताना पकडले होते. दोन लाख रुपयांची सहाय्यक महसूल अधिकारी यांनी मागितली होती

छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजी नगर महसूल विभागात एसीबीने मोठी कारवाई करत एक लाचखोर अधिकाऱ्याला जेरबंद केले आहे.वाळू वाहतूक करताना पकडलेला हायवा ट्रक सोडण्यासाठी सहायक महसूल अधिकारी तथा अव्वल कारकुनाने 2 लाख रुपये लाचेची मागणी केली.काशिनाथ आनंदा बिरकलवाड (वय 41), असे लाच घेणाऱ्या अव्वल कारकुनाचे नाव आहे. हा कारकून उप विभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत आहे.या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री पार पडली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार 9 एप्रिल रोजी रात्री संभाजीनगर परिसरात यातील तक्रारदारास त्याच्या हायवा ट्रकने वाळू वाहतूक करताना पकडले होते. त्यावेळी काशिनाथ बिरकलवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे कारवाई न करण्यासाठी प्रथम 2 लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 1 लाख 10 हजार रुपये मागणी करून 70 हजार रुपये रात्रीच स्वीकारले होते. तसेच उर्वरित 40 हजार रुपये देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने येथील लाचलुचपात प्रतिबंधक विभागाकडे समक्ष हजर राहून तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी 10 एप्रिल रोजी करून

लाच मागितल्याच्या अनुषंगाने गुरुवारी काशिनाथ बिरकलवाड यांच्याकडे तक्रारदार व पंचाला पाठवून लाच मागणी पडताळणी केली. काशिनाथ बिरकलवाड यांनी स्वतः करीता प्रथम 40 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 30 हजार रुपये लाच मागणी केली व आजच लाच रक्कम स्वतः स्वीकारण्याचे मान्य केले. 30 हजार रुपये पंच क्रमांक 1 यांचे समक्ष जालना रोडवरील रामगिरी हॉटेल समोर रंगेहात पकडले.सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0