क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Bomb Threat News : 10 मिनिटांत बॉम्ब फुटणार!’ – ग्रँड हयात हॉटेलला धमकीने खळबळ

Grand Hayat Hotel Bomb Threat News : जर्मनीहून आलेला अनोळखी कॉल, मुंबई पोलिसांची तात्काळ कारवाई

मुंबई :- “दहा मिनिटांत बॉम्ब फुटणार आहे!” – मुंबईच्या प्रतिष्ठित ग्रँड हयात फाइव्ह स्टार हॉटेलला आलेल्या या एका कॉलने संपूर्ण परिसरात हाहाकार माजवला. Grand Hayat Hotel Bomb Threat News आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आलेल्या या फोन कॉलने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना अलर्टवर टाकले. हॉटेल प्रशासनाने तात्काळ वाकोला पोलिसांशी संपर्क साधताच बॉम्ब शोध पथक (BDDS) घटनास्थळी धावले आणि संपूर्ण हॉटेलची कसून झडती घेतली. Mumbai Police Latest News

अनोळखी कॉलरचा दावा – “10 मिनिटांत स्फोट!”
कॉलरने थेट कस्टमर केअरवर फोन करून म्हटले की, हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि तो काहीच मिनिटांत स्फोट करणार आहे. तपासात असा कॉल जर्मनीहून आल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.

हॉटेलमध्ये कोणताही स्फोटक पदार्थ सापडला नसला, तरी अशी सातवी बनावट धमकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी ताज, ऑबेरॉय, मुंबई विमानतळ, शाळा, कॉलेज आणि रेल्वे स्थानकांना अशाच स्वरूपाच्या धमक्या आल्या होत्या. पोलिसांनी त्या सर्व प्रकरणांचा तपास करत खोट्या कॉलर्सवर गुन्हे दाखल केले आहेत.

मुंबई पोलीस सतर्क – नागरिकांनी अफवांपासून सावध राहावे
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाकोला पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, परंतु अफवांवर विश्वास ठेवू नये.

अनोळखी कॉलरचा दावा – “१० मिनिटांत स्फोट!”
कॉलरने थेट कस्टमर केअरवर फोन करून म्हटले की, हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि तो काहीच मिनिटांत स्फोट करणार आहे. तपासात असा कॉल जर्मनीहून आल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0