मुंबई
Trending

Shivrajyabhishek Din : राज्याभिषेक दिनी रायगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्राभिमान जागवणारी उपस्थिती

Shivrajyabhishek Din : शिवछत्रपतींच्या पराक्रमाला नमन; सुवर्ण होनांनी पुतळ्याचा अभिषेक, शिवसृष्टीसाठी निधी देण्याची ग्वाही

रायगड | छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 व्या राज्याभिषेक Shivrajyabhishek Din दिनानिमित्त रायगडावर पारंपरिक पद्धतीने भव्य सोहळा पार पडला. या ऐतिहासिक क्षणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी उपस्थित राहून शिवप्रेमींमध्ये राष्ट्रभक्तीचे नवे संजीवनी दिले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराजांच्या पुतळ्याला विधिवत दुग्धाभिषेक आणि सुवर्ण होनांनी अभिषेक केला. यावेळी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा देत “शिवरायांच्या आदर्शावर आधारित लोककल्याणकारी राज्याची” शपथ घेतली गेली.

“तेज तम अंस पर, कान्ह जिमी कंस पर, त्यो मलिच्छ बंनस पर, सेर शिवराज है..!”

शिंदे म्हणाले, “छत्रपतींनी ज्या दिवशी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तो दिवस प्रत्येक मराठी मनासाठी पूजनीय आहे. आजही जगभरातील मराठी बांधव तोच उत्साह घेऊन हा दिवस साजरा करतात, ही बाब अभिमानास्पद आहे.”

तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गैरहजेरी भारत गौरव रेल्वे उद्घाटनामुळे असल्याचे सांगून, त्यांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यकाळातील महत्त्वाची घोषणा आठवून दिली—रायगड पायथ्याशी ‘शिवसृष्टी’साठी 50 कोटींचा निधी आणि 50 एकर जागा मंजूर करण्यात आली होती. पुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.

यानंतर जगदीश्वर मंदिर आणि शिवरायांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केले. कार्यक्रमाला मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार मंगेश चव्हाण, आमदार महेंद्र थोरवे, युवासेना पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0