क्राईम न्यूजठाणेमुंबई

Mumbai Murder News : मुंबई हादरली! प्रेयसीवर चाकूने हल्ला करून तरुणाची आत्महत्या

Mumbai Kalachowki Latest Murder News : काळाचौकी परिसरात भरदिवसा थरार; जुन्या प्रेमसंबंधातून घडली घटना, तरुणीची प्रकृती गंभीर

मुंबई :- मुंबईतील काळाचौकी परिसरात शुक्रवारी (24 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका अत्यंत धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जुन्या प्रेमसंबंधातून संतापलेल्या एका तरुणाने 24 वर्षीय प्रेयसीवर चाकूने हल्ला करून नंतर स्वतः आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. Mumbai Murder News

नेमके काय घडले?

सोनू बराई (Sonu Barai) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोनू आणि त्याची प्रेयसी काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरून चालत येत असताना त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला जाताच, सोनूने अचानकपणे आपल्या खिशातील चाकू काढला आणि तरुणीवर हल्ला केला.

जीव वाचवण्यासाठी ती तरुणी जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये धावली. सोनू तिच्या मागे गेला आणि त्याने तरुणीवर पुन्हा चाकूचे वार केले. त्यानंतर त्याने त्याच चाकूने स्वतःवरही वार करून घेतले. भर दिवसा आणि गर्दीच्या वेळी हा थरार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

एक ठार, एक गंभीर

या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असलेल्या सोनू बराई याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरुणीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघांचे प्रेमसंबंध होते, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचे संबंध तुटले होते. याच कारणामुळे संतापलेल्या तरुणाने हा हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0