क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Robbery News : मोलकरणीचा 6 महिन्यांचा ‘गेम’ पोलिसांनी 24 तासांत केला खल्लास! 10 लाखांचे दागिने लंपास करणारी घरकामगार जेरबंद

Mumbai Matunga Police Latest News : माटुंगा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; चावी हरवल्याचा बनाव करून मोलकरणीने केला होता डल्ला

मुंबई | नोकरीच्या निमित्ताने कामात व्यस्त असणाऱ्या मालकिणीच्या घराचे कपाट उघडून 10 लाख 98 हजार 299 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. कविता शिंदे असे या अटक करण्यात आलेल्या मोलकरणीचे नाव असून, तिच्याकडून चोरीचा बराचसा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नेमकी घटना काय?

5 जून 2025 रोजी फिर्यादीच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीचे (फिर्यादीच्या आईचे) सोन्याचे दागिने फिर्यादीकडे सांभाळण्यासाठी दिले होते. फिर्यादीने हे दागिने दादर पूर्व येथील राहत्या घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच कपाटाची चावी घरात सापडेनाशी झाली. कामाच्या व्यापापामुळे फिर्यादीने कपाटाकडे फारसे लक्ष दिले नाही. घरात काम करणाऱ्या कविता शिंदेसह तीन मोलकरणींना चावीबाबत विचारले असता, त्यांनी आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगितले.

असा उघड झाला चोरीचा प्रकार?

सुमारे 6 महिने उलटल्यानंतर, 3 जानेवारी 2026 रोजी फिर्यादीने चावी बनवणाऱ्या कारागिराला बोलावून लॉकर उघडले. तेव्हा त्यांना लॉकरमधील सुमारे 11 लाखांचे दागिने गायब असल्याचे दिसले. घरात मोलकरणींशिवाय बाहेरील कोणाचेही येणे-जाणे नसल्याने संशयाची सुई घरकामगारांकडे वळली. माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे वेगाने फिरली.

पोलिसी खाक्या दाखवताच कबुली

तपासी अधिकारी विनोद पाटील आणि त्यांच्या पथकाने घरातील तिन्ही मोलकरणींची तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने चौकशी केली. सुरुवातीला नकार देणाऱ्या कविता शिंदे हिचा बनाव पोलिसांच्या उलटतपासणीसमोर टिकू शकला नाही. तिनेच हे दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून 10 लाख 24 हजार रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत केली आहे.

तपास पथकाचे कौतुक

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उप-आयुक्त श्रीमती रागशुधा आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब घटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. पथकातील पोलीस हवालदार आनंद तांबे, महेश नेहारे, पंडित बंजारा, संभाजी बार्शी, योगेश नवले आणि महिला पोलीस शिपाई प्रियंका रावरे यांचा या कारवाईत मोठा वाटा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0