मुंबई
Trending

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा हाहाकार; पश्चिम उपनगरांना झोडपले, लोकल उशिराने

Mumbai Rain Update Latest News : जोरदार पावसाची शक्यता; राज्यातील अनेक जिल्ह्यांना ‘यलो’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट

मुंबई :- मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पुढील तीन ते चार तास मुंबईच्या काही भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली या भागात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. Mumbai Rain Latest News

पावसाचा जोर कायम असला तरी, अद्याप सखल भागांत पाणी साचलेले नाही. मात्र, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल काही मिनिटे उशिराने धावत आहेत, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, जळगाव आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही आज पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा अंदाज दिला आहे. यामध्ये, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, उर्वरित जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0