Uddhav Thackeray & Sanjay Raut Fined : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर न्यायालयाने दोन हजार रुपयांचा ठोठावला दंड.

•मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने Uddhav Thackeray & Sanjay Raut यांना दोन हजार रुपयांचा दंड, राहुल शेवाळे यांनी केला होता दावा
मुंबई :- लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राहुल शेवाळे यांनी ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून वारंवार बदनामीकारक वक्तव्य केले जात आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा केला होता. त्यानंतर न्यायालयाने ठाकरे आणि राऊत यांच्यावर दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
माजी खासदार राहुल शेवाळे हे सध्या शिंदे गटात आहे आणि प्रचारादरम्यान राहुल शेवाळे यांच्या विरोधात ठाकरे आणि राऊत यांच्याकडून अनेक विधान करण्यात आले होते त्याच्या विरोधात राहुल शेवाळे यांनी मानहानी खटला न्यायालयात दाखल केला होता. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष ने कोर्टाने यावेळी खटल्याचा निर्णय देताना निर्णय दरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे तसेच मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी एक हजार रुपये अतिरिक्त दंड छोटा होताना एकत्रित दोन हजार रुपये दोन आठवड्यात जमा करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने आदेश दिले आहे.
मानहानीच्या दाव्यातून आरोप मुक्त करण्यासाठी दोघांनी अर्जही केला होता. परंतु उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेला अर्ज दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला आहे. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्याने दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने दोन हजार रुपये दंड ठोठावून तो दहा दिवसात जमा करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिले आहे.


