Mumbai Latest News : हृदयद्रावक घटना! बहिणीला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली आणि दोघींचा बुडून मृत्यू

Mumbai Kalu Water Latest News : टिटवाळ्याजवळच्या काळू नदीत दोन अल्पवयीन बहिणींचा बुडून अंत; परिसरात शोककळा
कल्याण :- एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत टिटवाळ्या जवळील काळू नदीत दोन अल्पवयीन बहिणींचा बुडून मृत्यू झाला आहे. बहिणीला वाचवण्यासाठी दुसऱ्या बहिणीने नदीत उडी घेतली, मात्र पाण्याचा वेगवान प्रवाह असल्याने दोघीही बुडाल्या. रुक्षान वाहिद हुसेन अन्सारी (15 वय) आणि सना वाहिद हुसेन अन्सारी (10 वय) अशी या दुर्दैवी बहिणींची नावे आहेत. Mumbai Kalu Water Accident News
कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघी बराच वेळ परतल्या नाहीत; एका मुलीचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघी बहिणी मंगळवारी दुपारी वासुंद्री भागातील आपल्या घरातून कपडे धुण्यासाठी काळू नदीवर गेल्या होत्या. कपडे धूत असताना अचानक एक कपडा नदीच्या पात्रात पडला. तो घेण्यासाठी सनाने (10 वय) पाण्यात उडी मारली, मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ती वाहून जाऊ लागली. हे पाहून तिला वाचवण्यासाठी तिची मोठी बहीण रुक्षानने (15 वय) देखील पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघीही खोल पाण्यात बुडाल्या.
मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
मुली बराच वेळ घरी परतल्या नाहीत म्हणून कुटुंबीय काळजीत पडले आणि त्यांनी नदीकाठी धाव घेतली. त्यांना कपड्यांची बादली आणि कपडे तिथेच ठेवलेले दिसले. त्यांना मुली पाण्यात बुडाल्याचा संशय आला आणि त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.
अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. नदीतील गाळ ढवळून काढल्यानंतर काही वेळाने सनाचा मृतदेह पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगताना दिसला. तिला तात्काळ रुग्णालयात पाठवण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुसऱ्या मुलीचा, रुक्षानचा, शोध अद्यापही सुरू आहे. या घटनेने पाटीलनगर भागात शोककळा पसरली असून, नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने हा दुर्दैवी अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


