मुंबई

Ketaki Chitale Controversy | केतकी चितळेच्या नव्या वादामुळे मराठी भाषाप्रेमी संतापले!

Ketaki Chitale Controversy | “मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला?” – अभिनेत्रीच्या प्रश्नाने नवा वाद

पुणे :- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा नव्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. Ketaki Chitale Controversy यावेळी तिने थेट मराठी भाषेच्या ‘अभिजात दर्जा’च्या मागणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मराठी भाषाप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. तिच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर टीकेचा मोठा भडीमार सुरू झाला आहे.

नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये केतकी चितळेने म्हटले आहे की, “मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला? ही तर निव्वळ ‘इन्सिक्युरिटी’ आहे.” इतकेच नाही, तर “मराठी बोलणार नाही, न बोलल्याने भोकं पडतात का?” असे सवाल करत तिने अनेकांना धक्का दिला आहे. तिच्या या विचित्र प्रश्नांनी, स्वतः मराठी असूनही तिने मराठी भाषेच्या अस्मितेवरच घाला घातल्याची भावना निर्माण झाली आहे.

यावर अधिक स्पष्टीकरण देताना केतकीने सांगितले की, एका जवळच्या व्यक्तीने तिला सांगितले की हिंदी आणि उर्दू भाषांनाही अभिजात दर्जा नाही, तरीही ते भांडत नाहीत. यावर केतकीने प्रतिप्रश्न केला, “ते का भांडतील? दर्जा पाहिजे, त्यामुळे फक्त इन्सिक्युरिटी वाटते. दर्जा मिळाला, त्याने काय झालं? आम्हाला दर्जा पाहिजे-दर्जा पाहिजे, त्यामुळे इन्सिक्युरिटी आणखी वाढते.” अशा शब्दांत तिने मराठी भाषिक लोकांच्या मागणीला ‘असुरक्षिततेचे’ प्रतीक ठरवले आहे.

“मराठीत बोल-मराठीत बोल, मराठी येत नाही. अरे! तो बोलेल नाही बोलणार, त्याने काय मराठी भाषेचं नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना! तुम्ही तुमची स्वतःची इन्सिक्युरिटी दाखवताय. त्याने काय फरक पडतोय? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही,” असेही केतकी चितळेने म्हटले आहे.

राज्यात आधीच हिंदी-मराठी भाषेचा वाद उफाळला असताना आणि मायबोली मराठीच्या अस्तित्वासाठी मराठी माणूस एकवटला असताना, केतकीने मराठीबाबत केलेली ही विधाने अनेकांना चीड आणणारी ठरली आहेत. मराठी भाषेच्या सन्मानासाठी लढणाऱ्या अनेकांना तिच्या या वक्तव्यामुळे मोठा धक्का बसला आहे. तिच्या या वक्तव्याचे काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0