मुंबई

Mumbai News : डोंबिवलीकरांसाठी गुडन्यूज! मध्य रेल्वे मार्गावर 12 मीटर रुंद पादचारी पुलासाठी आज रात्री ‘मेगा ब्लॉक’

•दिवा-कल्याण दरम्यान जलद आणि पाचव्या-सहाव्या मार्गावर मध्यरात्री 3 तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक

मुंबई :- मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. स्थानकावर 12 मीटर रुंदीच्या नवीन पादचारी पुलाचे (Foob Over Bridge – FOB) बांधकाम वेगाने सुरू असून, आज (बुधवारी) रात्री या पुलासाठी तुळया (Girders) उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने अप आणि डाऊन जलद मार्गांसह पाचव्या-सहाव्या मार्गावर विशेष वाहतूक ब्लॉक जाहीर केला आहे.

ब्लॉकची वेळ आणि ठिकाण:

दिवा – कल्याण (पाचवी व सहावी मार्गिका): रात्री 12.20 ते 3.20 पर्यंत (3 तासांचा ब्लॉक)

अप आणि डाऊन जलद मार्ग: रात्री 1.20 ते 3.20 पर्यंत (2 तासांचा ब्लॉक)

लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम:

या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

गाडी क्रमांक ११०४१, २२८६५ आणि २२५३८ या गाड्या ब्लॉक काळात दिवा – कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील.

अप दिशेकडे जाणारी गाडी क्रमांक ११०२० आणि १८५१९ या गाड्या कल्याण – पनवेल विभागामार्गे वळवण्यात येतील. कल्याण प्रवाशांना उतरवण्यासाठी त्यांना पनवेल आणि ठाणे येथे थांबा दिला जाईल.

याशिवाय, गाडी क्रमांक २२१०४ कल्याण येथे २५ मिनिटे, तर १२१०२ कल्याण येथे २० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १८०३० खडवली येथे १० मिनिटे थांबवण्यात येईल.

या विशेष कामादरम्यान लांब पल्ल्याच्या इतर नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांमध्ये आवश्यकतेनुसार बदल किंवा थांबवण्यात येऊ शकतात. डोंबिवली स्थानकातील प्रवाशांना या १२ मीटर रुंद पादचारी पुलामुळे मोठी सोय होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0