क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Girgaon News : बेस्ट बस वाहकाला भररस्त्यात बेदम मारहाण; क्षुल्लक कारणावरून प्रवाशाला अटक

Girgaon Accident News : गिरगावमधील फणसवाडी परिसरात घडली घटना; गणवेश फाडून शिवीगाळ

मुंबई :- बेस्ट बसच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गिरगावमध्ये एका प्रवाशाने कर्तव्यावर असलेल्या बसच्या वाहकाला (कंडक्टर) क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग (एल.टी. मार्ग) LTT Police पोलिसांनी 29 वर्षीय तरुण प्रवाशाला तातडीने अटक केली आहे. Girgaon Latest Accident News

नेमकी घटना काय घडली?

बेस्टमध्ये बस वाहक म्हणून कार्यरत असलेले फिर्यादी केशव रघुनाथ लोखंडे (वय 41) हे रविवारी (2 नोव्हेंबर) गिरगाव-ठाकुरद्वार रोडवरील फणसवाडी परिसरातून जाणाऱ्या बसमध्ये (एमएच ०१- डीआर ३९२७) कर्तव्यावर होते.दुपारी 1.30 च्या सुमारास बस विनय हॉटेलजवळून जात असताना, एक तरुण प्रवासी बसमध्ये चढला.

या तरुणाने क्षुल्लक कारणावरून बस वाहक लोखंडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कर्तव्यावर असलेल्या सरकारी कर्मचारी लोखंडे यांना कामापासून अडवले, त्यांच्याशी वाद घातला आणि त्यांचा खाकी गणवेष फाडला.त्यानंतर आरोपीने बसवाहकाला शिवीगाळ करून मारहाण केली.

याप्रकरणी बसवाहक लोखंडे यांनी एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 121 (1), 132, 115 (2) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0