पुणे
Trending

Maratha Reservation : ‘फडणवीसांना मराठ्यांनीच सत्तेत आणलं, संधीचं सोनं करा’; मुंबईतील आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी मिळाल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक

Manoj Jarange Latest News : ‘पुढील लाट राजकीय करिअर बरबाद करेल’; जरांगे पाटील यांचा थेट इशारा

जुन्नर :- मराठा आरक्षणासाठी Maratha Arkshan मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारल्यानंतरही, राज्य सरकारने एक दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी नाकारत जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.
बुधवारी सकाळी जालन्यातील आंतरवली सराटीमधून निघालेल्या जरांगे यांचे गुरुवारी जुन्नर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

‘एका दिवसाची परवानगी म्हणजे चेष्टा’

मनोज जरांगे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी आमच्या वेदना समजून घेणे गरजेचे आहे. आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देणे म्हणजे मराठा समाजाची चेष्टा आहे.” ते पुढे म्हणाले, “फडणवीस महाराष्ट्रात कोणत्याही आंदोलकांना आझाद मैदानात जाण्यापासून थांबवणार नाहीत, अशी आम्हाला आशा होती. पण त्यांनी जाणूनबुजून एक दिवसाचीच परवानगी दिली. त्यांनी मोठे मन दाखवायला हवे होते आणि मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी द्यायला पाहिजे होती.”

‘तुमचे सरकार मराठ्यांच्या मतांवर आलेय’

जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारला एकप्रकारे इशाराच दिला. ते म्हणाले, “तुमचे बहुमताचे सरकार मराठ्यांच्या मतांवरच आले आहे. तुमच्याविरोधात मराठ्यांची लाट वारंवार आली, तर येणारे दिवस तुमचे राजकीय करिअर बरबाद करणारे असतील.”

शेवटी त्यांनी फडणवीसांना संधी साधण्याचे आवाहन केले. “मी आजही तेच सांगतोय, देवेंद्र फडणवीस यांना आता योग्य संधी आहे. संधीचे सोनं करा. मराठ्यांची मने जिंकण्याची संधी आहे. तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. हेच मराठे गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार विसरणार नाहीत, हा आमचा शब्द आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0