मुंबई
Trending

Sabha Raut : हनी ट्रॅपचा स्फोटक वाद! प्रफुल्ल लोढाच्या अटकेनंतर महाजन-राऊत यांच्यात आरोपांची धग

Sanjay Raut On Mahajan : “चार मंत्री, चार खासदार हनी ट्रॅपमध्ये अडकले; फोटो सीबीआयने तपासावेत” – संजय राऊत यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

मुंबई :- राज्यात हनी ट्रॅपचा Honey Trap विषय चांगलाच तापला असून, त्यात आता राजकीय नेते, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पुढे येऊ लागली आहेत. भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या प्रफुल्ल लोढा Prafull Lodha यांच्यावर हनी ट्रॅपचा गुन्हा Honey Trap दाखल झाल्यानंतर या वादाने जोर धरला आहे.

यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी एक्सवर प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन यांचा एकत्र फोटो शेअर करत म्हणाले, “मुख्यमंत्री विधिमंडळात दिशाभूल करतात, पण प्रत्यक्षात हनी ट्रॅप आहेच! या फोटोची सीबीआय चौकशी होऊ द्या, दूध का दूध, पानी का पानी होईल.”

राऊतांनी आरोप केला की, “चार मंत्री आणि अनेक वरिष्ठ अधिकारी या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. काही वर्षांपूर्वी फुटलेले चार तरुण खासदारही या ट्रॅपमुळेच पळाले होते.”

गिरीश महाजन यांचा पलटवार:

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी रोखठोकपणे संजय राऊत आणि एकनाथ खडसेंवर निशाणा साधला.”प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे. त्याचे फोटो शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबतही आहेत. मग त्या सगळ्यांचीही हनी ट्रॅप चौकशी करायची का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याचबरोबर, एकनाथ खडसे यांच्यावरही त्यांनी घणाघात केला.
“प्रफुल्ल लोढा याने काही वर्षांपूर्वी खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूची एसआयटी चौकशी मागितली होती. मग आता त्या प्रकरणाची चौकशी सुरू करायची का?” असे म्हणत महाजनांनी जुने मुद्दे उकरून काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0