मुंबई
Trending

Dahisar Fire News : दहिसरमध्ये 23 मजली इमारतीला भीषण आग; एका महिलेचा होरपळून मृत्यू, 19 जखमी

Dahisar Latest Fire News Update : तळघरातील मीटर बॉक्समध्ये आग, चौथा मजला जळून खाक; 36 रहिवाशांची सुटका, दोघांची प्रकृती गंभीर

मुंबई :- मुंबईच्या दहिसर भागात एस. व्ही. रोडजवळील न्यू जनकल्याण सोसायटी या 23 मजली इमारतीला रविवारी दुपारी भीषण आग लागली. Dahisar Fire News या दुर्घटनेत एक महिला होरपळून मरण पावली असून, 19 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. Dahisar Latest News

दुपारी 3 च्या सुमारास शांती नगरमधील या इमारतीच्या सातव्या मजल्यावर अचानक आग लागल्याचे समजले. आग लागल्याचे कळताच रहिवाशांनी इमारतीबाहेर पळ काढला, मात्र अनेक जण आत अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशमन दलाने ही आग लेव्हल 2 ची घोषित केली आणि बचावकार्य सुरू केले.

आग इमारतीच्या तळघरातील दोन मीटर बॉक्समधून सुरू झाली आणि चौथ्या मजल्यापर्यंतची विद्युत यंत्रणा जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीच्या विळख्यात सापडलेल्या 36 रहिवाशांची सुटका केली. यातील 19 जण जखमी झाले. त्यांना रोहित, नोर्थरन केअर, प्रगती आणि कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रोहित रुग्णालयात दाखल केलेल्या दोन जखमींपैकी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच, शताब्दी रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचीही प्रकृती गंभीर आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल याचा पुढील तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0