मुंबई
Trending

Sanjay Raut : “भाजप म्हणजे ‘डी गँग’! – संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल”

Sanjay Raut Latest News: फरार गुन्हेगारांना भाजपमध्ये प्रवेश… उद्या दाऊदलाही घेतील का?”

मुंबई | भाजपकडे गेल्याचे प्रमाण म्हणजे राजकीय स्वार्थ आणि गुन्हेगारीच्या भीतीतून उचललेले पाउल आहे, असा सडेतोड आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. “आजचा भारतीय जनता पक्ष म्हणजे डरपोक लोकांची ‘डी गँग’ झाली आहे,” अशा शब्दांत राऊतांनी भाजपवर जहरी टीका केली. Sanjay Raut Latest News

नाशिकमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मामा राजवाडे यांच्यासह काही नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या सर्वांवर गुन्हे दाखल असून ते पोलिस रेकॉर्डनुसार फरार आहेत. “भाजप आता अशा फरार लोकांना सामावून घेत आहे, उद्या ते दाऊद इब्राहिमलाही पक्षात घेतील,” असा सडेतोड टोला राऊतांनी लगावला.

“राणेंनी वयाचा विचार करावा; महाराष्ट्र अजूनही स्वाभिमानावर टिकलेला आहे – राऊतांचे प्रतिउत्तर”

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, “तीन वेळा पक्ष बदलणाऱ्या आणि सर्वत्र गोंधळ घालणाऱ्या राणे यांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही.” भाजपमध्ये गेलेले मराठी नेते हे महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्रिभाषा सूत्रावरूनही राऊतांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. “संघ परिवाराशी संबंध असलेले नरेंद्र जाधव हे समिती अध्यक्ष असूनही, महाराष्ट्र मराठीवरील अन्याय सहन करणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

याच अनुषंगाने 5 जुलै रोजी होणाऱ्या मराठीभाषा कार्यक्रमासाठी संजय राऊत यांनी जनतेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या व्यासपीठावरील मुख्य आकर्षण “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे” असणार असल्याचं सांगत, या कार्यक्रमात कोणताही प्रोटोकॉल नसेल, केवळ मराठी अस्मितेचा जल्लोष असेल, असं त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0