
Kojagiri Pornima : 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11.45 ते 12.34 पर्यंत चंद्र आणि लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त; आरोग्य, मन आणि धनासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस.
Kojagiri Pornima : हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेली शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आज, 6 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी होत आहे. ही पौर्णिमा शरीर, मन आणि धनासाठी उत्तम मानली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र या रात्री 16 कलांनी पूर्णपणे भरलेला असतो. अशी धार्मिक मान्यता आहे की, या चंद्राच्या किरणांमधून पृथ्वीवर अमृताचा वर्षाव होतो.
यंदा पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.24 वाजता झाला असून, तिथीची समाप्ती 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9.35 वाजता होणार आहे. त्यामुळे 6 ऑक्टोबर रोजी रात्री देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केली जाईल.
कोजागिरी पौर्णिमेच्या आकर्षक शुभेच्छा संदेश
1.चांदण्यांनी न्हालेल्या आकाशाखाली, दुधाच्या गोडीत वाढू दे नात्याचा विश्वास! लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर कायम राहो. कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
2.आज 16 कलांनी पूर्ण झालेल्या चंद्राच्या किरणांतून अमृताचा वर्षाव व्हावा, आणि तुमच्या जीवनात सुख-समृद्धीचा आनंद नांदो. शुभ कोजागिरी!
3.मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, आजचा दिवस सुख-समाधान व आनंदाची उधळण करणारा जावो. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
4.’कोजागरी’ म्हणजेच ‘कोण जागा आहे?’ आजच्या या पवित्र रात्री जागरण करून देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवा. लक्ष्मीकृपा तुमच्यावर सदैव असो!
5.पौर्णिमेचा चंद्र, रुपेरी प्रकाश… ही कोजागिरीची रात्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी ठरो. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
6.ही शरद पौर्णिमा तुमच्या जीवनात आरोग्य, प्रेम आणि धन घेऊन येवो! चंद्राचा शीतल प्रकाश तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करो. कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा!
7.तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण रुपेरी चांदण्यांनी उजळून निघो. नात्यांमधील प्रेम साखरेसारखे गोड राहो. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
8.प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा, साजरा करू या सण कोजागिरीचा… या खास रात्री लक्ष्मीमातेचे आशीर्वाद तुम्हाला मिळोत!
9.मन, शरीर आणि धन या तिन्हीसाठी उत्तम असणाऱ्या या पौर्णिमेच्या दिवशी, तुम्हाला आनंद आणि समाधान लाभो हीच सदिच्छा! शुभ कोजागिरी!
10.चांदण्यांत न्हालेले आकाश, दुधाच्या गोडीत वाढला नात्यांचा विश्वास, लक्ष्मीमातेची मिळो कृपा खास, कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा अनंतास!


