Instagram Friendship News : ‘इन्स्टाग्राम फ्रेंडशिप’च्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओद्वारे खंडणी उकळणारे 2 इसम अटक

Mira Bhayandar Latest Fraud News : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून पीडितेला आणि तिच्या नातेवाईकांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ; व्हिडिओ कॉलदरम्यान 18 वर्षीय पीडित मुलीला विवस्त्र होण्यास भाग पाडून केला व्हिडिओ रेकॉर्ड
मीरा-भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (कक्ष-1, काशिमीरा) Kashmira Crime Branch Unit 1 सायबर गुन्ह्यांतील एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. इन्स्टाग्रामवरून मैत्री करून अश्लील व्हिडिओच्या आधारे खंडणी स्वीकारणाऱ्या भिवंडी येथील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. Mira Bhayandar Crime News
नेमका गुन्हा काय घडला?
नयानगर पोलीस ठाणे Nayanagar Police Station हद्दीतील 18 वर्षीय फिर्यादी मुलीला ऑगस्ट 2025 मध्ये एका अनोळखी इंस्टाग्राम आयडीवरून ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली होती. Instagram Scam Alert आरोपीने तो दिल्लीचा असून सध्या लंडनमध्ये व्यवसाय करत असल्याचे सांगितले. मैत्री झाल्यानंतर त्यांच्यात व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू झाले. Mira Bhayandar Latest Crime News
व्हिडिओ कॉलद्वारे अत्याचार: दिनांक 06 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास आरोपीने फिर्यादीला व्हिडिओ कॉल करून धमकावून विवस्त्र होण्यास भाग पाडले आणि तिचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला.
खंडणी: दुसऱ्या दिवशी आरोपीने तो ‘सीबीआय’ (CBI) मधून बोलत असल्याचे भासवून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि फिर्यादीकडे 18 हजारांची खंडणीची मागणी केली. फिर्यादीने काही रक्कम आरोपीच्या बँक खात्यावर मनी ट्रान्सफरद्वारे पाठवली.
नातेवाईकांना धमकी: यानंतरही आरोपीने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून पैशांची मागणी केली. इतकेच नव्हे तर, फिर्यादीच्या वडील आणि भावालाही सदर अश्लील व्हिडिओ पाठवून तो व्हायरल न करण्याकरिता खंडणी मागितली.
पोलिसांची कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-1, काशिमीरा यांनी समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे खंडणीची रक्कम भिवंडी येथील मोहम्मद शादाब मो. मुश्ताक अन्सारी याच्या खात्यात स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम त्याने पुढे भिवंडी येथेच राहणाऱ्या मोहम्मद ताहा मो. मुजाहिद अन्सारी याच्या खात्यात पाठवली होती.
पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मोहम्मद ताहा अन्सारी याने खंडणीच्या रकमेतून युएसडीटी (USDT) ही क्रिप्टोकरन्सी खरेदी करून ती परदेशस्थित वकास खान या व्यक्तीकडे पाठविल्याचे निष्पन्न झाले आहे.
या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी नयानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध नयानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे.


