क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Virar Drug News : विरारमध्ये गांज्याचा साठा उघडकीस – अंमली विक्रेत्यांवर पोलिसांचा हल्लाबोल!

Virar Latest Drug Racket News : विरार गंगनेरी अपार्टमेंटमध्ये कारवाई; 2.8 किलो गांजा आणि रोख रक्कम जप्त

विरार :- वसई गुन्हे शाखा कक्ष-2 Vasai crime Branch Unit 2 च्या पथकाने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत विरार पूर्वेतील गंगनेरी अपार्टमेंटमध्ये छापा टाकून लाखो रुपयांचा गांजा आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. Virar Latest Crime News

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या गुप्त माहिती संकलन मोहिमेतून, (28 मे) रोजी दुपारच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांच्या बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, गंगनेरी अपार्टमेंटमधील एका खोलीत गांज्याचा साठा करून विक्री केली जात आहे.

त्या आधारे पोलिस पथकाने गणपती मंदिरासमोर असलेल्या सय्यद मंजिल परिसरात छापा टाकला. या कारवाईत प्रद्युम्न विठ्ठल कांबळे (25 वय) हा इसम गांज्यासह ताब्यात आला. त्याच्या चौकशीत, सदर अंमली पदार्थ त्याने अल्ताफ उर्फ लाला सय्यद हुसेन याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर अल्ताफच्या राहत्या घरात झडती घेतली असता, 2 किलो 806 ग्रॅम ओलसर गांजा, रोख रक्कम आणि अंमली पदार्थ विक्रीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण 1 लाख 69 हजार 760 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(ii)(ब), 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0