Mumbai New Commissioner of Mumbai Police : आयपीएस देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

Senior IPS officer Deven Bharti has been appointed as the new Commissioner of Mumbai Police : 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती आयपीएस विवेक फणसळकर यांच्या जागी नवे पोलीस आयुक्त. फणसळकर यांचा कार्यकाळ बुधवारी संपत आहे. देवेन भारती मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त होते
मुंबई :- वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती हे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त असतील. Mumbai New Commissioner of Mumbai Police यापूर्वी देवेन भारती हे मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त होते. देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. Senior IPS officer Deven Bharti ते मुंबईचे सर्वात जास्त काळ सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून काम करणारे आहेत.

कोण आहे देवेन भारती?
1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले भारती सुमारे 54 वर्षांचे आहेत. भारती मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केले आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईत डीसीपी, झोन 9 आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम केले..ते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षण करणारे महत्त्वाचे कार्यालय असलेल्या संयुक्त पोलीस आयुक्तांपैकी एक होते. याशिवाय त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख यांसारखी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासह शहरात नोंदवलेल्या अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासात देवेन भारती सहभागी होते.
देवेन भारती हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2014 ते 2019 दरम्यान देवेन भारती यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलं. परंतु ऑक्टोबर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने त्यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळमध्ये (MSSC) बदली केली.देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, मिड डे वृत्तपत्राचे पत्रकार जे. डे यांची हत्या या प्रकरणांचा तपास त्यांनी केला. राज्यात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचं जाळं नष्ट करण्यासाठीही ते ओळखले जातात.


