
MS Dhoni Get ICC Hall Of Fame 2025 : भारताच्या क्रीडा इतिहासात आणखी एक सुवर्णपान, तीन जागतिक विजेतेपदांचा कप्तान आता अमर कीर्तीत,धोनीसोबत हेडन आणि अमलाही मिळाला बहुमान
ICC Cricket :- टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सर्वोच्च सन्मानाने गौरवले असून, त्याचे नाव ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. MS Dhoni Get ICC Hall Of Fame 2025 हा बहुमान मिळवणाऱ्या 2025 मधील सात दिग्गज खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा मैथ्यू हेडन आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला यांचीही निवड झाली आहे.
धोनीने या सन्मानाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळणं ही मोठी अभिमानास्पद बाब आहे. अशा महान खेळाडूंमध्ये स्वतःचं नाव पाहणं हा एक विलक्षण अनुभव आहे.”
कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा धोनी 2011 चा विश्वचषक जिंकवून देणारा एकमेव भारतीय कर्णधार आहे. त्याने ३ मोठे ICC ट्रॉफी – 2007 टी20 वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी – भारताच्या झोळीत घातले.
धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 538 सामने खेळून एकूण 17,266 धावा, 829 बळी (विकेटमागून) घेतले. वनडेमध्ये सर्वाधिक 123 स्टंपिंग, विकेटकीपरद्वारा सर्वाधिक 183 धावांचा स्कोर, आणि भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक 200 सामने खेळण्याचा मान त्याच्याकडे आहे.
आजही 2011 च्या वानखेडेवरच्या त्या विजयी षटकाराचा आवाज आणि दृश्य प्रत्येक भारतीयाच्या आठवणीत कोरलेलं आहे — आणि आता तो इतिहास ICC हॉल ऑफ फेममध्ये अजरामर झाला आहे.



