मुंबई
Trending

Sanjay Turde : “राज साहेब, माफ करा!”मनसेला मुंबईत जबर धक्का! संजय तुर्डे यांनी थेट शिंदे गटाचा रस्ता पकडला

Sanjay Turde Joined Eknath Shinde Group : उद्धव-राज एकत्र येण्याच्या चर्चेत शिंदे गटाची मोठी खेळ

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे Sanjay Turde यांनी अखेर मनसेला रामराम ठोकला आहे आणि लवकरच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही घटना मनसेसाठी मोठा धक्का मानली जात आहे.

कालिना विभागातून 2012 मध्ये निवडून आलेले तुर्डे हे मनसेचे ओळखते चेहरा होते. त्यांनी पक्षात दीर्घ काळ योगदान दिले असले तरी पक्षातील निर्णय प्रक्रियेतील अकार्यक्षमता आणि स्थानिक नेतृत्वातील मतभेद यामुळे त्यांनी दुसऱ्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे गटाने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली असून, तुर्डेंसारख्या अनुभवी चेहऱ्यांच्या माध्यमातून स्थानिक ताकद वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. कालिनासारख्या मराठी मतदारवर्ग असलेल्या भागात ही भर शिंदे गटासाठी रणनीतीचा भाग ठरणार आहे.

संजय तुर्डे कोण आहेत?

संजय तुर्डे हे मुंबईतील कालिना विभागातून मनसेचे माजी नगरसेवक राहिले आहेत. 2012 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी मनसेकडून निवडून येत आपली ताकद सिद्ध केली होती. त्यानंतर पक्षात सातत्याने सक्रिय राहून त्यांनी मनसेच्या विविध उपक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही, मात्र संजय तुर्डे यांनी पक्षाशी आपली निष्ठा कायम ठेवली होती. त्यामुळे त्यांच्या पक्ष त्यागामुळे मनसेच्या मुंबईतील संघटनात्मक आधाराला मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0