
Big Boss Pranit More Latest Update : डेंग्यूमुळे वैद्यकीय उपचारांसाठी घराबाहेर; टीमकडून ‘हेल्थ अपडेट’ जारी
मुंबई :- ‘बिग बॉस-19’ Big Boss 19 मधून महाराष्ट्राचा लाडका कॉमेडियन प्रणीत मोरे Pranit More याचं बाहेर जाणं चाहत्यांसाठी सर्वात मोठा धक्का होता. गेल्या आठवड्यात, बसीर आणि नेहल घराबाहेर गेल्यानंतर, या आठवड्यात प्रणीत मोरेला वैद्यकीय कारणांमुळे शो सोडावा लागला. प्रणीत मोरेला डेंग्यू झाल्यामुळे त्याला खेळ पुढे नेता आला नाही. सलमान खानने ‘वीकेंड का वार’मध्ये ही घोषणा केली, ज्यामुळे चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण होतं. मात्र, आता प्रणीत मोरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
खरं कारण ‘एलिमिनेशन’ नाही
प्रणीत मोरेला ‘बिग बॉस सीजन 19 ‘मधून बाहेर काढण्यात आलेलं नाही, तर डेंग्यूमुळे त्याला केवळ वैद्यकीय मदतीसाठी बाहेर पाठवण्यात आलं आहे.
सलमान खानने ‘वीकेंड का वार’ भागात स्पष्ट केलं होतं की, डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार प्रणीतला उपचारांसाठी घर सोडावे लागेल आणि तो जात असल्यामुळे इतर सर्व सदस्य सुरक्षित आहेत.
प्रणीत मोरे लवकरच परतणार?
प्रणीत मोरे घराबाहेर पडताच, त्याच्या टीमने चाहत्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने एक हेल्थ अपडेट जारी केलं. त्यांनी प्रणीत मोरेच्या ऑफिशियल इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं.
“मित्रांनो, तुम्हाला सर्वांसोबत एक अपडेट शेअर करायची होती. आता प्रणितची प्रकृती ठीक आहे. आम्ही ‘बिग बॉस टीम’शी सतत संपर्कात आहोत आणि ते आम्हाला त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी आणि प्रार्थनांसाठी खूप खूप धन्यवाद… कृपया त्याला लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत राहा… जय हिंद, जय महाराष्ट्र!”
प्रणीतची प्रकृती सुधारत असल्याने आणि टीम सतत बिग बॉसच्या टीमशी संपर्कात असल्याने, प्रणीत मोरे लवकरच बरा होऊन शोमध्ये पुन:प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरातले त्याचे मित्रही त्याला लवकर परत येण्याची विनंती कॅमेऱ्यासमोर करत आहेत.
दरम्यान, प्रणीत मोरे सध्या एका सीक्रेट रूममध्ये वैद्यकीय उपचारांसाठी ठेवण्यात आला आहे. त्याच्या जाण्यानंतर, आणखी एका नॉमिनेशन कार्यात फरहाना भट्ट, गौरव खन्ना, नीलम गिरी, अभिषेक बजाज आणि अशनूर कौर यांना नॉमिनेट करण्यात आले आहे.


