क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Drugs News : मुंबईत 6.40 लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; निर्मलनगर पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Latest Drugs News : खार पूर्व परिसरात सापळा रचून अंमली पदार्थ तस्कराला अटक, आरोपीला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी; ड्रग्जच्या स्रोताचा तपास सुरू

मुंबई :- निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हेगारी प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई करत 6 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. Mumbai Latest Drug News गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून, एका अंमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली आहे. Mumbai Latest Crime News

नेमके काय घडले?

दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी निर्मलनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश बहीरवाडे यांना खार पूर्व, मुंबई येथील ‘प्रसाद एन एक्स हॉटेल’ समोर एमडी ड्रग्जची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे आणि पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बनकर यांच्यासह पोलीस पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी सापळा रचला असता, दिनांक 10 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास बीएमसी चौकीजवळ एका संशयित इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ 32 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ विक्रीसाठी ठेवलेला आढळला. त्याची किंमत सुमारे 6 लाख 40 हजार रुपये आहे.

पोलिसांनी पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेतले आणि 11 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले.न्यायालयाने आरोपीला 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपीने हा अंमली पदार्थ कोठून मिळवला आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत, याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत.

अपर पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया आणि पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मलनगर पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0