महाराष्ट्र
Trending

Axiom-4 Mission Launch : भारताचा अंतराळाकडे आत्मविश्वासाने भरारी! ‘Axiom-4’ मोहिमेतून ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची ऐतिहासिक अंतराळयात्रा सुरू

•ISS वर 2 आठवड्यांची वैज्ञानिक मोहिम; मधुमेहावर संशोधनासह शैक्षणिक प्रयोगांची तयारी

ANI :- भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे तीन अन्य सहप्रवाशांसह आज दुपारी 12.01 वाजता (IST) ‘Axiom-4’ या खासगी अंतराळ मोहिमेद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) दिशेने झेपावले. नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून Falcon-9 रॉकेटने या मोहिमेची यशस्वी सुरुवात झाली.

शुक्ला यांच्यासह अमेरिकेचे एन मॅक्लेन, निकोल आयर्स आणि अनुभवी अंतराळवीर पैगी व्हिटसन हेही या मोहिमेत सहभागी आहेत. हे चौघेही लो-अर्थ ऑर्बिटमध्ये जाऊन ISS च्या ‘हार्मनी मॉड्यूल’ला गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजता (IST) जोडले जाणार आहेत. संपूर्ण प्रवास सुमारे 29 तासांचा असणार आहे.

या मोहिमेअंतर्गत अंतराळवीर सुमारे दोन आठवडे ISS वर राहून मधुमेहासंबंधी संशोधन, शैक्षणिक प्रकल्प आणि विज्ञानप्रेरक प्रयोगांमध्ये भाग घेणार आहेत. नील आर्मस्ट्रॉंग यांच्याही मून मिशनला पाठवले गेलेले हेच लॉन्च पॅड वापरण्यात आले असून, ही मोहिम भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी एक अभिमानास्पद टप्पा मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0