मुंबई

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे राष्ट्रपतीला पत्र

Anjali Damania Wrote Letter President Droupadi Murmu Eknath Khadse Politics : एकनाथ खडसे यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले

मुंबई :- शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार एकनाथ खडसे Eknath Khadse हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या सून रक्षा खडसे यांना भाजपच्या वतीने रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांची एखाद्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्त केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया Anjali Damania यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना Droupadi Murmu पत्र लिहून तशी शिफारस झाली तर ती नाकारण्याची विनंती केली आहे.

भाजपमध्ये असताना नाराज झालेले एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहणे पसंत केले. मात्र, असे असले तरी अद्याप विधान परिषदेतील आमदारकी व्यतिरिक्त त्यांना इतर कोणताही लाभ झालेला नाही. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी ते आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या प्रवेशाबाबत भाजपचे राज्यातील नेत्यांमध्ये मात्र, उत्सुकता नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांनी त्यांची थेट राज्यपाल पदी वर्णी लावण्याचा मार्ग निवडला आहे. मात्र, त्यांची राज्यपाल पदी नियुक्ती होण्याआधीच त्यांच्या बाबतची तक्रार अंजली दमानिया यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांची पोस्टच्या माध्यमातून दिली माहिती

या विषयाची माहिती अंजली दमानीया यांनी एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की,

‘माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोणत्याही राज्याच्या/ केंद्रशासित प्रदेशाच्या राज्यपालपदी नियुक्त करण्याची कोणतीही शिफारस नाकारण्याचे आवाहन आज मी माननीय राष्ट्रपतींना केले आहे. त्याची प्रत मी माननीय पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही पाठवली आहे.

राष्ट्रपतींना लिहिलेल्या 6 पानी पत्रात मी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती दिली आहे. मी माननीय राष्ट्रपतींना आवाहन केले आहे की सर्वोच्च अध्यक्षांच्या अशा कोणत्याही हालचालीमुळे देशातील नागरिकांचा आत्मविश्वास डळमळू शकतो.

नैतिक पतनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला राज्यपाल बनवता येत नाही. मी माननीय राष्ट्रपतींना वस्तुस्थिती समजावून सांगणारे अपील केले आहे आणि मला विश्वास आहे की त्या देशहिताच्या विरोधात काम करणार नाहीत.’

घटनेच्या कलम 60 नुसार, माननीय राष्ट्रपती संविधान आणि कायद्याचे जतन, संरक्षण आणि रक्षण करण्यासाठी त्यांच्या/ तिच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रयत्न करतील आणि ते/ती स्वतःला सेवेसाठी समर्पित करतील अशी अपेक्षा आहे. आणि भारतातील लोकांचे कल्याण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0