सोलापूरसोलापूर
Trending

Sujat Ambedkar Statement :”प्रणिती शिंदेंना भाजपमध्ये जायचे असते, तर त्या आज केंद्रात मंत्री असत्या!”; सुजात आंबेडकरांच्या आरोपांना काँग्रेसचे सडेतोड उत्तर

Sujat Ambedkar Statement : सुजात यांनी भाजप-आरएसएसची भाषा बोलू नये’; सोलापुरात काँग्रेस प्रवक्ते अशोक निंबर्गी यांचा ‘वंचित’वर हल्लाबोल

सोलापूर | वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर Sujat Ambedkar Statement यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सुजात आंबेडकरांच्या आरोपांचा समाचार घेताना काँग्रेस प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी यांनी स्पष्ट केले की, प्रणिती शिंदे यांच्या रक्तात काँग्रेस असून त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे.

‘बी-टीम’ वरून जुंपली

सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसवर भाजपची ‘बी-टीम’ म्हणून टीका केली होती. यावर उत्तर देताना निंबर्गी म्हणाले, “बी-टीम कोण आहे, हे सुजात यांच्या बोलण्यावरूनच स्पष्ट होत आहे. प्रणिती शिंदेंना भाजपने ‘रेड कार्पेट’ टाकले होते, अनेक ऑफर दिल्या होत्या. जर त्या भाजपमध्ये गेल्या असत्या, तर आज केंद्रात मंत्री असत्या. मात्र, त्यांनी ठामपणे काँग्रेससोबत राहणे पसंत केले.”

खासगी संबंधांचे राजकारण करू नका

सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा गौतम अदानी उपस्थित राहण्यावरून झालेल्या टीकेचाही निंबर्गी यांनी समाचार घेतला. “लग्न किंवा कौटुंबिक कार्यक्रम हे खासगी असतात. उद्या सुजात आंबेडकरांचे लग्न असेल, तर ते फडणवीस किंवा पवारांना बोलावणार नाहीत का? राजकारणाच्या पलीकडेही मैत्री असते, याचे भान सुजात यांनी ठेवायला हवे,” असा टोला त्यांनी लगावला.

युतीसाठी पुन्हा ऑफर

एकीकडे टीका करतानाच काँग्रेसने वंचितला पुन्हा एकदा युतीची साद घातली आहे. “मुंबईत काँग्रेससोबत युती करायची आणि सोलापुरात विरोधात बोलायचे, ही दुटप्पी भूमिका आहे. सोलापुरात आम्ही वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. वंचित आमच्यासोबत नाही, याचे आजही आम्हाला दुःख आहे. मात्र, आजही आमची ऑफर कायम आहे; जिथे वंचितची ताकद आहे, तिथे महाविकास आघाडी त्यांना मदत करेल,” असे निंबर्गी यांनी स्पष्ट केले.

‘विचारानी परिपक्व व्हा’

सुजात आंबेडकर हे प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र असून त्यांनी आंबेडकरी चळवळीतील ‘मनुवाद्यांना’ हुसकावून लावावे अशी अपेक्षा होती. मात्र, ते भाजप आणि आरएसएसप्रमाणे बुद्धीभेदाची भाषा करत आहेत, अशा शब्दांत निंबर्गी यांनी सुजात आंबेडकरांच्या विचारसरणीवर ताशेरे ओढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0