राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षातर्फे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर
राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते आमदार मा. श्री.डॉ.जितेंद्र आव्हाड साहेब तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष मा. सुहास भाई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव रमझान शेख यांनी स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खारघर सोबत मिलून खारघर तलोजा फेज १ येथे नागरिकांच्या सुलभ आरोग्यासाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सामान्य जनतेपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचवणे आणि आरोग्याबाबत जनजागृती करणे.


शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती. सर्वसामान्यांसाठी रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयविकार, दातांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, फुफ्फुस तपासणी यासारख्या अनेक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि शिबिराचे विशेष कौतुक केले.याप्रसंगी ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, ठाणे शहर विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष राहुल पाटील, जयेश पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


