क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Crime News : अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने 15 वर्षीय मुलीची आत्महत्या; 31 व्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवलं

Mumbai Latest Crime News : मुलुंड येथील अस्मि चव्हाणची दुर्दैवी आत्महत्या; भांडुपमधील महेंद्र स्प्लेंडर इमारतीतील घटना

मुंबई, भांडुप | मुंबईतील भांडुप परिसरात मंगळवारी सायंकाळी घडलेली एक हृदयद्रावक घटना सर्वांना सुन्न करणारी ठरली आहे. अभ्यासाच्या ताणातून निर्माण झालेल्या नैराश्यामुळे १५ वर्षीय अस्मि चव्हाण हिने ३१ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. Mumbai Latest Crime News

अस्मि ही मुलुंड परिसरात कुटुंबियांसोबत राहत होती. मंगळवारी ती भांडुप येथील एल.बी.एस. रोडवरील महेंद्र स्प्लेंडर या इमारतीत राहणाऱ्या आपल्या मित्रा आदित्य याला भेटण्यासाठी गेली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, अभ्यासाच्या ताणामुळे अस्मि काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त होती.

मित्राने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही इमारतीतून खाली उतरत असताना, अचानक अस्मिने ३१ व्या मजक्यावरून खाली उडी घेतली. स्थानिकांनी तिला तातडीने अगरवाल रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केल्याचे सांगितले.

या घटनेनंतर भांडुप पोलिसांनी Mumbai Bhandup Police अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. आदित्यची चौकशी करण्यात आली असून, अभ्यासाचा ताणच आत्महत्येचे मुख्य कारण असल्याचे त्याने सांगितले, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0