क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Crime News : “शाळकरी चिमुकलीवर विकृती… आणि तीन वर्षांचा फरार! अखेर आरोपी पोलिसांच्या सापळ्यात अडकला”

Mumbai Latest Crime News : 65 सिमकार्ड, चार राज्यं, खोटं नाव, वेगळी वेशभूषा – पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नराधमाची थरारक शिकार!

मुंबई | मुलीच्या निष्पापतेचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी तब्बल 3 वर्षं पोलिसांच्या हाताबाहेर होता. पण शेवटी गुप्त बातमी, डिजिटल पुरावे आणि पोलिसांच्या चिकाटीच्या जोरावर त्या नराधमाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विनोबा भावे नगर पोलिसांच्या Vinoba Bhave Police Station Crime Branch गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई गुजरातमधून केली. Mumbai Latest Crime News

18 जुलै 2022 रोजी एका शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर नौशाद इसरार अहमद (वय 22) हा आरोपी अक्षरशः चार राज्यांमध्ये लपून राहत होता. पोलिसांच्या नजरेत न सापडण्यासाठी त्याने आपल्या ओळखीतील प्रत्येक गोष्ट बदलली — नाव, वेश, फोन, लोकेशन! तो वेळोवेळी मोबाईल बदलून, तब्बल 65 सिमकार्ड वापरून पोलिसांना फसवत राहिला.

तरीही पोलिसांनी हार मानली नाही. आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे माग काढून, तो गुजरातमधील वडोदरा येथील “सेफ एक्सप्रेस” कुरीअर गोडाऊनमध्ये ट्रकचालक म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली. तिथे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून, क्षणाचाही विलंब न करता त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

अटक केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त सत्य नारायण चौधरी, अपर आयुक्त विक्रम देशमाने यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कामगिरी उभी राहिली. तपास पथकातील प्रत्येक अधिकाऱ्याने या मोहिमेसाठी अहोरात्र मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0