Pune Crime News : मकोक्का गुन्ह्यात पाहिजे असलेले दोन सराईत गजाआड ; गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी

दिनांक 21/02/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट ६ हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना माहिती मिळाली की, दिघी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड चे अभिलेखावरील मकोका व दरोद्याची तयारी गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले दोन आरोपी स्क्रीन नंबर 2, वैभव टॉकीज, हडपसर पुणे येथे छावा पिक्चर पाहण्यासाठी आलेले आहेत.
अशी माहिती मिळाल्याने युनिट 6 कडील सपोनी मदन कांबळे व स्टाफ यांनी सदर ठिकाणी जाऊन 1) दिघी पोलीस स्टेशन गु.र. नं. 355/2024 NDPS ॲक्ट 8(क)20(ब)(ii),29 MCOCA कलम 3(1)(ii),3(4) मधील पाहिजे आरोपी नामे धर्मेनसिंग उर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा वय 22 वर्षे रा. शिव कॉलनी नंबर 4 आदर्श नगर दिघी पुणे व 2) दिघी पोलीस स्टेशन 493/2024 BNS कलम 310(4),आर्म ॲक्ट कलम 4(25) मधील पाहिजे आरोपी बादशहशिंग पोलादसिंग भोंड वय 23 वर्षे, रा. शिव कॉलनी नंबर 4 आदर्श नगर दिघी पुणे यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास कामी दिघी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट – ६ चे अतिरिक्त कार्यभार प्रभारी पोलीस निरीक्षक छगन कापसे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.