पुणे

Prashant Jagtap : प्रशांत जगतापांचा काँग्रेस प्रवेश निश्चित; पण उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ 9 मिनिटांच्या फोनची पुण्यात जोरदार चर्चा!

•”शिवसेनेत या, सन्मान राखू”; ठाकरेंची ऑफर नाकारत जगतापांनी धरला ‘हात’

पुणे | पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार असल्याच्या निर्णयाला विरोध करत प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असतानाच, जगताप आज दुपारी 12 वाजता मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

उद्धव ठाकरेंचा ‘तो’ फोन आणि मोठी ऑफर

प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री उशिरा त्यांना फोन केला होता. या दोघांमध्ये तब्बल साडेनऊ मिनिटे चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जगतापांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले,”तुम्ही शिवसेनेत या, तुमचा योग्य सन्मान राखला जाईल. आम्ही भाजपसोबत कधीही जाणार नाही. पुण्याच्या भल्यासाठी तुम्ही आमच्यासोबत काम करू शकता.”

जगतापांनी का नाकारली ठाकरेंची ऑफर?

उद्धव ठाकरेंच्या फोननंतर प्रशांत जगताप यांनी त्यांचे आभार मानले, मात्र आपला कल काँग्रेसकडेच असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याशी साडेनऊ मिनिटे बोलणे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यांनी माझी योग्यता समजून घेतली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन.”जगताप यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, त्यांची विचारधारा काँग्रेसशी जुळणारी आहे. त्यामुळे “मी काँग्रेस विचारांचा असल्याने तुमच्याकडे (शिवसेनेत) येऊ शकत नाही,” असे त्यांनी ठाकरेंच्या नेत्यांना आधीच कळवले होते.

पुणे महानगरपालिकेत नवी समीकरणे

प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पुण्यात महाविकास आघाडीची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याने नाराज झालेले कार्यकर्ते आता जगतापांच्या मागे उभे राहतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जगताप यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांची लढाई ही ‘संविधान’ आणि ‘पुरोगामी’ चळवळीसाठी असून, ते भाजपचा कडाडून विरोध करणाऱ्या पक्षासोबत (काँग्रेस) राहणे पसंत करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0