ठाणे

Thane Crime News : सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 09 गुन्हयांची उकल

•एका रात्रीत चार महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीची चोरी गुन्हे शाखा कक्ष-1, ठाणे यांची कारवाई

ठाणे :- सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात ठाण्याच्या गुन्हे कक्ष-1 शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून 09 गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, आरोपीला एकाच रात्री तब्बल चार महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अजमेर राजस्थान येथून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 एप्रिलच्या रात्रीच्या वेळेस एका दुचाकी स्वाराने चार महिलांच्या गळ्यातील सोन सकाळी चोरी केल्या बाबतच्या तक्रारी नौपाडा, राबोडी, वर्तक नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या. प्रत्येक पोलीस ठाण्यात घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळीवरील प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना याबाबत सराईत गुन्हेगार असलेला सलमान फिरोज खान (25 वय रा. वाल्मीक नगर, बांद्रा) याला निष्पन्न केले. पोलिसांनी आरोपीचा मागवा घेताना आरोपी हा गुन्हा केल्यानंतर त्याच्या मूळ गावी अजमेर, राजस्थान येथे पसार झाल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मोटरसायकल सह सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात वर्तक नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता 2023 चे कलम 309 (4) या गुन्ह्यात अटक केली आहे. अटक आरोपीच्या विरोधात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल नऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार गुन्हे असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून शंभर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, पाच मंगळसूत्र, सोन्याच्या चैनी असा एकूण दहा लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिपक घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाईक, दिपक जाधव, पोलीस हवालदार प्रशांत निकुंभ, संदिप महाडिक, धनंजय आहेर, दिपक जाधव, नंदकुमार पाटील, पोलीस शिपाई सागर सुरळकर, मयुर लोखंडे, पोलीस हवालदार बाळु मुकणे, सर्व नेम. गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0