मुंबईमहाराष्ट्र
Trending

MLA Amarsingh Pandit : “माजी आमदार अमरसिंह पंडितांच्या खुनाचा कट होता!” – गेवराईतील राड्यानंतर स्वीय्य सहाय्यकाचा गंभीर दावा

Beed Crime News : मतदानादरम्यान दगडफेक, तोडफोड; अमृत डावखर यांना घरी घुसून बेदम मारहाण, बाळराजे पवारांनी पंडितांबद्दल विचारले होते

बीड :- राज्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असताना बीड जिल्ह्यातील Beed Crime News गेवराई तालुक्यातून एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. गेवराई नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान झालेल्या जोरदार राड्यात माजी आमदार अमरसिंह पंडित MLA Amarsingh Pandit यांचे स्वीय्य सहाय्यक अमृत डावखर यांना घरी घुसून बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यातून बचावल्यानंतर डावखर यांनी थेट अमरसिंह पंडितांच्या खुनाचा कट रचण्यात आल्याचा धक्कादायक दावा केला आहे. Beed Crime News

नेमके काय घडले?

मंगळवारी गेवराईमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान दोन गटांमध्ये दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि मारहाण झाली होती. याच राड्यात अमरसिंह पंडित यांच्या घरी जाऊन त्यांचे स्वीय्य सहाय्यक अमृत डावखर यांना लक्ष्य करण्यात आले. डावखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना लाठ्या-काठ्या आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली, यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणारे हल्लेखोर बाळराजे पवार यांच्यासह आले होते. डावखर यांनी दावा केला की, “बाळराजे पवार यांनी माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी अमरसिंह पंडित यांच्याबाबत विचारणा केली. त्यांच्या खुनाचा कट रचूनच ते घरी आले होते, त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आलेला होता. त्यांच्यासोबत काही अनोळखी लोक होते.” Beed Amarsingh pandit georai election voting

“माझा देखील जीव गेला असता, मात्र गाडी चालकाने मला सोडवलं,” अशा प्रकारचा धक्कादायक दावा अमृत डावखर यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एका निवडणुकीच्या वादातून थेट लोकप्रतिनिधीच्या खुनाचा कट रचण्यात आल्याचा दावा झाल्यामुळे बीड जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0