Kalyan Crime News : कल्याणमध्ये घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना अटक, 1.34 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Kashmira Crime Branch Latest News : काशिमीरा गुन्हे शाखेची मोठी कारवाई; सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त
कल्याण :- रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना मीरा रोडच्या काशीमीरा गुन्हे शाखा, कक्ष-1 ने Kalyan Crime Branch Unit 1 ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 34 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. Kalyan Crime News
काय आहे प्रकरण?
1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत मांडवीपाडा, काशीगावामधील एका घरात चोरी झाली होती. फिर्यादीच्या आई-वडिलांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातून 1 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास आणि आरोपींना अटक
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा कक्ष-1, काशीमीरा यांनी समांतर तपास सुरू केला. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत 8 ऑगस्ट रोजी सम्राट राजनारायण यादव (वय 25), अजय कबूल पटेल (वय 20) आणि सलीम अब्दुल रहमान सिद्दीकी (वय 20) या तिघांना ताब्यात घेतले. हे तिघेही मांडवीपाडा, काशीगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपासासाठी आरोपींना काशीगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात हजर करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1 च्या पथकाने केली.



